विभाग


N.C.C.

सुमारे 35 ते 40 वर्षे ग्रामीण भागात ब. प. विद्यालय मालगुंड शाळेत एन.सी.सी. विभाग चालू आहे. या विभागामार्फत छात्रांना नौदलाचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. या मध्ये परेड, शिप मॉडेलिंग, फायरिंग  याचे प्रशिक्षण दिले जाते.

त्याच प्रमाणे  सागर किनारा स्वच्छता, वृक्षारोपण, वनराई बंधारा, जनजागृती  रॅली हे उपक्रम राबविले जातात. सदर शैक्षणिक वर्षी 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC रत्नागिरी येथे दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये छात्रांनी उत्तम यश संपादन केले.

 देशाभिमान शिस्त निर्माण व्हावी छात्रांना विविध विषयाचे शिक्षण दिले जाते F/O श्री. उमेश श्रीराम केळकर हे उत्तम प्रकारे काम पाहतात.

स्काऊट गाईड विभाग

प्रशालेमध्ये स्काऊट गाईड विभाग कार्यरत असून इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थी यामध्ये सहभागी असतात शाळेत एकूण सहा युनिट कार्यरत आहेत. तृतीय सोपान पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड कार्यालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाते. राष्ट्रीय सणांच्या दिवशी स्काऊट गाईड चे विद्यार्थी संचालनामध्ये सहभागी होतात.

या विभागाचे काम श्री भीमराव पवार,श्री मिलिंद सुर्वे, श्री प्रवीण दातार हे स्काऊट मास्टर व सौ नेहा परकर व सौ.नेत्रा दुधाळे गाईड कॅप्टन पाहतात.


दत्तक पालक योजना

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना 1983 सालापासून सुरू असून ती  उत्तम प्रकारे राबवली जात आहे. सदर योजनेमध्ये पालक  ३१ सहभागी असून इयत्ता पाचवी ते बारावीतील गरजू व होतकरू मुलींना या योजनेचा लाभ मिळत आहे सदर योजनेमधून  ४३ विद्यार्थिनींना आर्थिक स्वरूपात शैक्षणिक मदत केली जाते.

सदर विभागाचे काम सर्व सहायक शिक्षिका सौ.नेहा बिपिन परकर करतात.


पेज योजना

प्रशालेमध्ये कै. सुधाकर बळीराम परकर यांच्या नावाने पेज योजना हा विभाग कार्यरत आहे. दूर अंतरावरून येणाऱ्या नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना  मधल्या सुट्टीमध्ये एक ग्लास पेज दिली जाते. शाळेतील सर्व शिक्षक व शिपाई  उत्तम सहकार्य करतात.


संगणक विभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये   पेंटागॉन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई येथील संस्थेने शाळेला देणगी रूपात   आठ संगणक संच व सहायक शिक्षक श्री.शिशिर शंकर आंबेकर यांनी दोन संगणक संच देणगी स्वरूपात दिले.  इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी संगणक प्रयोगशाळेत संगणकाचे प्रशिक्षण घेतात.  त्याचप्रमाणे शाळेमध्ये एलसीडी प्रोजेक्टरचा उपयोग करून एज्युकेशनल सॉफ्टवेअर द्वारे अध्यापन केले जाते. सदर विभागाचे काम   श्री.शिशिर शंकर आंबेकर पाहतात.

क्रीडा विभाग

प्रशाले मधील विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका जिल्हा पातळीवर यश संपादन करतात शैक्षणिक वर्ष 2023 -2024 साली  तायक्वांदो या क्रीडा प्रकारात कुमार अंश राकेश रसाळ या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून त्याची विभागीय स्पर्धेत निवड झाली . डिसेंबर महिन्यामध्ये अंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा महोत्सव मोठ्या उत्साहात  घेतला जातो यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल हे सांघिक खेळ व धावणे, गोळा फेक, लंब उडी, उंच उडी, कॅरम इत्यादी स्पर्धा प्रशालेमध्ये घेतल्या जातात.

2023-24 मध्ये श्री. अमोल साळगावकर यांनी मुलींसाठी 12 जोड स्पोर्ट शूज आणि 72 टी-शर्ट प्रशालेसाठी देणगी रूपाने  दिले या विभागाचे काम सहायक शिक्षक  श्री थोरात संजय व  श्री तावडे रुपेश हे करतात.


सायकल बँक

संस्थेमार्फत सायकल बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर सायकल वापरण्यास दिली जाते. या उपक्रमासाठी संस्थेने 32 सायकल्स खरेदी केल्या आहेत.

युवा अनस्टॉपेबल या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत शाळेला 30 सायकल्स देणगी दाखल मिळाल्या आहेत.   लांबून येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकल बँक चा उत्तम लाभ होतो आहे.  पर्यवेक्षक श्री उमेश केळकर तर सहाय्यक म्हणून संजय थोरात काम पाहत आहेत.

गरीब विद्यार्थी फंड

गरीब विद्यार्थी फंडातून विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. या फंडामधून वह्या, दप्तर हे शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप केले जाते. सदर फंडास शिक्षक व विद्यार्थी आपल्या वाढदिवसा निमित्त देणगी देतात. विभाग प्रमुख म्हणून सौ. दुधाळे मॅडम काम पाहतात. 


कै.सदानंद बळीराम परकर अभ्यास शिबीर 

प्रशालेमध्ये इयत्ता दहावी व बारावी या वर्गांचा उत्तम निकाल लागावा म्हणून कै. सदानंद बळीराम परकर अभ्यास शिबीर हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांच्या स्वाध्यायिका दिल्या जातात व त्या त्यांनी अभ्यास करून सोडवणे अपेक्षित असते.  विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याची व लिखाणाची सवय लागते व त्याचा उपयोग प्रशालेचा निकाल 100% लागण्यासाठी मदत होतो. शिबीर प्रमुख म्हणून श्री थोरात सर व श्री. मोडक सर काम पाहतात.

वाढदिवस

प्रशालेमध्ये सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा 50 वा वाढदिवस  हा  संस्थेचा उपक्रम   मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  प्रशाला पातळीवर प्रार्थनेच्या वेळेला ज्या  विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्याला  शुभेच्छा दिल्या जातात शिक्षकांचा वाढदिवस ही शुभेच्छा देऊन साजरा केला जातो.

सहल

प्रशालेमध्ये दिवाळी सुट्टीनंतर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते विविध किल्ले वैज्ञानिक केंद्र अशा स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घडवून आणला जातो ज्या विद्यार्थ्यांना लांब पल्ल्याच्या सहलीमध्ये येणे शक्य नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना निसर्ग सहलीचा आनंद  मिळवून दिला जातो. सहलीचे नियोजन सहल प्रमुख  श्री. मिलिंद सुर्वे व श्री. भीमराव पवार सर करतात.